
स्थैर्य, 21 फेब्रुवारी, सातारा : सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाकडून (जी.डी.सी.अॅण्ड ए. बोर्ड) घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. अॅण्ड ए.) परीक्षा-2026 व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम) परीक्षा-2026, दिनांक 26, 27 व 28 मे, 2026 रोजी घेण्यात येणार आहे.
जी.डी.सी. अॅण्ड ए. व सी. एच. एम. परीक्षा, 2026 साठी https://gdca.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 10 मार्च रात्री 8 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच बँकेमध्ये चलनाने भरणा करण्याची मुदत दि.13 मार्च पर्यंत करण्यात आलेली आहे. तरी सदरबाबत संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजयकुमार सुद्रिक यांनी केले आहे.

