
स्थैर्य, सातारा, दि. 28 : गोडोली येथील त्रिशंकू भागातल्या त्रिमूर्ती कॉलनीत गटार रस्त्यावर वाहत असल्याचे वृत्त तरुण भारतने प्रसिद्ध करताच ते काम तातडीने करण्यात यावे याकरता निधी द्यावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण यांनी सभापती सरिता इंदलकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सातारा शहरातल्या त्रिशंकू भागात गोळीबार मैदान येथील त्रिमूर्ती कॉलनीत रस्त्यावर गटार वाहत आहे अशी तक्रार तेथील स्थानिक नागरिकांनी केली होती.त्यानुसार तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध केले होते.पंचायत समितीचे सदस्य आशुतोष चव्हाण हे आपल्या गणातील समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतात.त्यांनी ते काम करण्यासाठी सामजिक कार्यकर्ते रवी पवार यांनाच घेऊन सभापती सरिता इंदलकर यांच्याकडे निवेदन देऊन निधीची मागणी केली आहे.हे काम पूर्ण होई पर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे आशुतोष चव्हाण यांनी सांगितले.