
दैनिक स्थैर्य । 17 मे 2025। फलटण । माजी खासदार स्व. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांनी दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी पाहिलेली स्वप्नपूर्ती आज त्यांचे सुपुत्र माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रचंड संघर्ष करून पूर्ण केली. काळज ते आंदरुड या कॅनॉलच्या कामाच्या दुसर्या टप्प्याला 964 कोटी रुपये एवढा प्रचंड निधी मंजूर करून आणल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमित रणवरे यांनी त्यांचे जाहीर आभार मानले आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना रणवरे म्हणाले कि, गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आंदोरी येथे जाणीवपूर्वक थांबवलेला कॅनॉल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नातून हे काम मंजूर केले आणि प्रत्यक्षात मौजे आंदोरी, खंडाळा ते काळज पर्यंतच पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वास जात आहे. आणि आता दुसरा टप्पा काल जाहीर केला. लवकरच प्रत्यक्षात काम सुरू होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नातून हे काम पूर्णत्वास जात आहे.
निधी मंजूर करून केल्याबद्दल लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन कांबळे-पाटील यांचे आभार रणवरे यांनी व्यक्त केले आहे.