रेव्हेन्यू क्लबसाठी ९ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजुर; शाशन आदेश निर्गमित; रणजितसिंह व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 24 फेब्रुवारी 2025 | फलटण | फलटण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या रेवेन्यू क्लब साठी महाराष्ट्र शासनाने ९ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले असून काही दिवसांपूर्वीच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेवेन्यू क्लबची पाहणी करून सदरील क्लबच्या दुर्दशेबाबत नाराजी व्यक्त केलेली होती. त्यानंतर तातडीने प्रस्ताव सादर करून रेवेन्यू क्लबच्या भव्य दिव्य इमारतीसाठी तब्बल दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.

फलटण शहरातील रेव्हेन्यू क्लबची दुरावस्था मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या इमारतीची पाहणी केली असून लवकरच या क्लबचे नूतनीकरण करण्याचे आश्वासन दिले आहे. रेव्हेन्यू क्लबची सध्याची स्थिती अत्यंत दयनीय आहे. एकेकाळी वैभवशाली असलेली ही इमारत आता मोडकळीस आली आहे. इमारतीची अवस्था इतकी बिकट आहे की तिच्या खाली उभे राहणेही धोकादायक वाटते; असे मत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले होते.

फलटण शहरात मध्यवर्ती असलेल्या रेव्ह्येन्यू क्लबची पूर्णतः मोडकळीस आली आहे, या जुन्या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी सुमारे दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी मंजूर करून आणण्यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या विशेष प्रयत्नांचा महत्त्वपूर्ण हातभार आहे. या कामासाठी समस्त महसूल परिवाराच्या वतीने निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

रेव्हेन्यू सबोर्डिनेट वेलफेअर फंड कमिटी, फलटणचे अध्यक्ष आणि निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे मनापासून आभार मानले आहेत. अभिजित सोनवणे यांनी सांगितले की, “महसूल परिवाराच्या सुविधेसाठी ही नवीन इमारत अत्यंत महत्त्वाची आहे. या कामासाठी रणजितदादा व आमदार पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आम्हाला ही मंजुरी मिळाली आहे.”

रेव्हेन्यू सबोर्डिनेट वेलफेअर फंड कमिटी, फलटण

स्थापना – १५ जून १९६७

पत्ता : रेव्हेन्यू क्लब फलटण, रविबर पेठ, फलटण, जि. सातारा, महाराष्ट्र राज्य. पिनकोड-४१५५२३

अध्यक्ष : अभिजीत अशोक सोनवणे, निवासी नायब तहसीलदार

सचिव : लक्ष्मण सुभाष अहिवळे, तलाठी मिरढे तालुका फलटण


Back to top button
Don`t copy text!