दैनिक स्थैर्य | दि. 22 जून 2022 | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा व माढा लोकसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे जी कामे प्रलंबित होती; ती कामे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुरावा व प्रयत्नांमुळेच पूर्णत्वास जात आहेत. फलटण – कोरेगाव विधानसभा व माढा लोकसभा मतदारसंघाच्या कोणत्याही योजनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी कमी पडू देणार नाही; अशी ग्वाही उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील फलटण शहर, फलटण ग्रामीण व वाठार स्टेशन या पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभात उपमुख्यमंत्री ना. फडणवीस बोलत होते. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, प्रवीण दरेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, पोलीस निरीक्षक शंकर पाटील, धन्यकुमार गोडसे, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
वारकरी बांधवाना जे विमा संरक्षण दिले आहे; त्या बद्दल हजारो वारकर्यांनी आभार मानले आहेत. मी गृहमंत्री असताना नूतन पोलीस स्टेशन, अधीक्षक कार्यालय या सोबतच पोलिसांना राहण्यासाठी चांगल्या दर्जाची घरे मिळावी या साठी आपण प्रयत्न करत आहे. पूर्वीच्या काळात पोलीस बांधव खुऱ्याड्यात राहत होते. आता ते भव्य घरात राहत आहेत. आता राज्यात ज्या ज्या ठिकाणी नव्याने पोलीस स्टेशन होत आहेत ती अतिशय सुसज्ज अशी व नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने पोलीस स्टेशन होणार आहेत, असेही ना. फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्ह्यामध्ये पोलिसांचे कार्य उत्तम असून मोक्का सारखी कारवाई सुद्धा ही संघटित गुन्हेगारीवर होत आहे; याचा आनंद आहे. जिल्ह्याचा अपराध सिद्धीचा दर गेल्या वर्षभरात 50% वर पोहचला आहे. गुन्हेगार यांच्यावर शिक्षा होण्यासाठी हा अपराध सिद्धीचा दर हा अत्यंत महत्वाचा आहे. सातारा जिल्ह्यातील पोलीस खात्यातील कोणताही निधी कमी पडू न देण्याचे काम करणार आहे; असेही ना. फडणवीस यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना पालकमंत्री ना. देसाई म्हणाले की, आज उद्घाटन होत असलेल्या या तिन्ही पोलीस स्टेशनच्या प्रस्ताव हा मी गृह राज्यमंत्री असताना दिले होते. याला ना. देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिल्याबद्दल आभार मानतो. जिल्हा नियोजन मधून आता पोलीस विभागाला निधी देता येत आहे; याबाबत आपण अधिकार हे जिल्हा नियोजनला दिल्याबद्दल सुद्धा पोलिसांचे विविध प्रश्न आता मार्गी लागत आहेत. महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण जिल्ह्यामध्ये विशेष प्रकल्प राबवत आहोत. पोलिसांच्या घराबद्दल सातारा जिल्ह्यातील तीन प्रकल्प प्रलंबित आहेत ते मार्गी लावावेत; अशी आग्रहाची मागणी सुद्धा यावेळी ना. देसाई यांनी उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्याकडे यावेळी केली.
उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी फलटण जिल्हा न्यायालयासाठी येत्या कॅबिनेट मीटिंगमध्ये आर्थिक मान्यता देण्यात येणार आहे. फलटण ते पुणे रेल्वे सुरू झाली आहे. आता आगामी काळात फलटण ते पंढरपूर रेल्वे सुरू होईल. त्यासाठी आपण निधी मंजूर करून हस्तांतर केला आहे. धोम – बलकवडीसाठी आपण विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे; यामुळे आता हा कॅनॉल बारमाही सुरू राहणार आहे. नीरा – देवधरचे टेंडर सुद्धा प्रकाशित करण्यात आले आहे; त्यामुळे नक्कीच या भागाचा कायापालट नक्की होईल. माढा लोकसभा मतदारसंघाचे खरे शिल्पकार हे ना. देवेंद्र फडणवीस आहेत, असे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.
फलटण शहर व वाठार स्टेशन ही ब्रिटिश कालीन पोलीस स्टेशन आहेत. या सोबतच फलटण शहर, ग्रामीण व वाठार स्टेशन या तीनही पोलीस स्टेशनची इमारत सुद्धा जुन्या काळातील आहेत. आता नव्याने होणारी पोलीस स्टेशन ही सुसज्ज असून अत्याधुनिक सोयीसुविधानी सज्ज असतील. या साठी गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मानले.
आभार अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.