मलठणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : खासदार रणजितसिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१५ एप्रिल २०२२ । फलटण । नगरपरिषदेच्या सत्ताधारी मंडळीनी मलठणला विकासापासून वंचित ठेवलेले आहे. मलठणमध्ये खासदार निधीतून तेहतीस लाख २८ हजार रूपायांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आगामी काळामध्ये मलठणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

लोकसभेवर निवडणून गेल्यांनतर कोरोना या जागतिक महामारीने सर्व खासदारांचे निधी गोठवण्यात आलेले होते. त्यानंतर आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर आता पुन्हा निधी वितरित करण्यात येत आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये मलठणसह फलटण शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची माहिती यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

मलठण येथील सगुणामाता मंदीर ते सिध्दीविनायक मंदीर या एचटी लाईनमुळे सर्वसामान्य नागरिकांना बांधकामांत निर्माण होणारे अडथळे त्यासोबतच शॉर्ट सर्किट होवुन होणारे नुकसान आता बंद होणार आहे. एचटी लाईनबाबतच्या कामाचे आदेश महावितरण कंपनीकडून पारित करण्यात आलेले आहेत. त्याचे ही काम लवकरात लवकर सुरू होईल. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर यांच्या विशेष सहकार्याने आगामी काळामध्ये मलठणसह संपूर्ण फलटण शहराचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे, अशी माहीती या वेळी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!