दैनिक स्थैर्य | दि. 23 ऑगस्ट 2023 | सातारा | सातारा जिल्ह्यातील फलटण येथील कत्तलखान्यातून भारतातील अतिरेक्यांना वित्त पुरवठा केला जातो नियमबाह्य पद्धतीने महाराष्ट्राचे पशुधन संपवणाऱ्या हा कत्तलखाना तात्काळ बंद करावा अशी मागणी अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत केली.
संघटनेचे मंगेश नरे निवृत्त पशुसंवर्धन आयुक्त सुधीर भोसले इत्यादी उपस्थित होते. एकबोटे म्हणाले, फलटण येथे दोन दिवसांपूर्वी गोरक्षक सौरभ सोनवणे आणि अक्षय तावरे यांच्या सहकार्याने दहा म्हशींची गाडी ताब्यात घेऊन गोशाळेत पाठवण्यात आली. यापैकी चार म्हशी दूध देणाऱ्या होत्या. त्यांची कत्तल गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे तात्पुरती टळली. मात्र भारतीय प्राणी संवर्धन कायदा 2015 या कायदा महाराष्ट्रात लागू होऊन सुद्धा या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. फलटण येथील कत्तलखान्यामधून देशी खिलारी गाई आणि म्हशी यांची कत्तल सुरू आहे . हा कत्तलखाना तत्काळ बंद करण्याची मागणी त्यांनी केली.
एकबोटे पुढे म्हणाले सध्या भारतात १४ कोटी लिटर दूध उत्पादन होते मात्र ६४ कोटी लिटर दूध विकले जाते ही बाब गंभीर आहे दुधाची भेसळ आणि लोकांचे आरोग्य याबाबत अन्न औषध प्रशासन सुद्धा गंभीर भूमिका घेत नाही गोधनाचे रक्षण करण्यासाठी पोलिसांच्या बघ्याची भूमिकेमुळे गोरक्षकांना उतरावे लागत आहे . पशुसंवर्धन समिती ही जिल्हास्तरावर कार्यान्वित करावयाची असून पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी यावर ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. स्वतंत्र टास्क फोर्स नेमून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये आर्थिक तरतूद करावयाचे नियमांत आहे मात्र हा कायदा प्रभावीपणे राबवला जात नाही फलटण येथील कत्तलखान्याला राज्य राजकीय वरदहस्त आहे या कारखान्यातून अतिरेक्यांना वित्त पुरवठा केला जात असल्याचा खळबळ जनक आरोप एकबोटे यांनी केला . सातारा जिल्ह्यातील गोरक्षकांना पोलीस संरक्षण मिळावे आणि महाराष्ट्र प्राणी अधिनियम २०१५ चे प्रभावी अंमलबजावणी व्हावी प्रशासनाने या संदर्भातील इच्छाशक्ती दाखवावी आणि पशु गणन्यांमध्ये पशुंची संख्या वाढावी अशा विविध मागण्याने एकबोटे यांनी यावेळी केल्या.