पिंपळदरी तलावाच्या दुरुस्तीसह सिंचनअनुशेषासाठी निधी देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२३ । मुंबई । हिंगोली जिल्ह्यातील औंढा – नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी तलावाच्या सांडवा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध आहे. या तलावाच्या दुरुस्तीसह हिंगोली जिल्ह्याचा सिंचनअनुशेष पूर्ण करण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून देण्यात येईलअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य संतोष बांगर यांनी पिंपळदरी येथील सांडव्याची दुरुस्ती करणेबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीमाजी मालगुजारी तलावलघु पाटबंधारे तलावामधील गाळ काढण्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच माजी मालगुजारी तलावाच्या संवर्धनाचा कार्यक्रम आखण्यात येईल.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारसदस्य अशोक चव्हाण, नाना पटोलेप्रकाश आबिटकरतानाजी मुटकुळे यांनी सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!