दैनिक स्थैर्य । दि. २८ एप्रिल २०२२ । सातारा । खासदार श्रनिवास पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सातारा लोकसभा मतदारसंघातील सातारा, कोरेगांव, लोणंद, मेढा, वाई व महाबळेश्वर ह्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या क्षेत्रातील विकासकामांसाठी 2.50 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने हा निधी मंजूर केल्याने सदर शहरातील विकासकामे मार्गी लागणार आहेत. याची माहिती खासदार पाटील यांच्या संपर्क सूत्रांद्वारे देण्यात आली आहे.
नगरपंचायतीमना नागरी सुविधा पुरवण्यासाठी सहाय्य योजनेतंगर्त तर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतंर्गत नगरपरिषदांना हा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये सातारा पालिका कार्यक्षेत्रात मधीलअजिंक्य कॉलनी, पोवई नाका येथे अजिंक्यतारा सोसायटीच्या खुल्या जागेत सुशोभिकरण करण्याच्या कामासाठी 10 लक्ष,कोडोली सातारा येथील रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 15 लक्ष पिरवाडी येथील रस्ते कॉंक्रिटीकरण करणे तसेच एस.टी.कॉलनीच्या पाठीमागे श्री.राजेंद्र सरकाळे यांच्या घराशेजारून रस्ता करणे कामासाठी 20 लक्ष असा सातारा पालिकेसाठी 45 लाख निधी मंजूर झाला आहे.
कोरेगाव नगरपंचायत मध्ये भैरवनाथ मंदिर रस्ता ते मोहितेवाडा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व अंडरग्राउंड ड्रेनेज करणे 25 लक्ष, लालसिंग राव शिंदे यांच्या घरापासून ते चंद्रकांत जाधव सर कॉंक्रिटीकरण व अंडरग्राउंड ड्रेनेज करणे 25 लक्ष असा एकूण 50 लक्ष निधी मंजूर झाला आहे. महाबळेश्वर नगरपरिषद मध्ये नामदेव हौसिंग सोसायटी अप्रोच रोड अंडरग्राउंड केबलींग वर्क करणे 10 लक्ष, अंबिका हाउसिंग सोसायटी अप्रोच रोड अंडर रोड अंडरग्राउंड केबलींग वर्क करणे 10 लक्ष असा एकूण 20 लक्ष, मेढा नगरपंचायत मधील मेढा मुख्य रस्ता व मुख्य चौक येथे हायमास्ट दिवे 5 नग बसवणे 10 लक्ष, लक्ष्मीमाता मंदिर (देशमुखवाडी) संरक्षण भिंत व मोकळ्या जागेमध्ये जिमखाना बांधण्यासाठी 25 लक्ष असा एकूण 35 लक्ष निधी मंजूर झाला आहे.
वाई नगरपरिषद मधील हॉटेल पर्ल ते रेस्ट हाऊस फूटपाथ बनवणे 20 लक्ष, वार्ड क्रमांक 9 ख्रिश्चन दफनभूमीसाठी शेड बांधणे आणि लादीकरण करणे 20 लक्ष, वाई नगरपरिषद हद्दीतील गणपती आळी येथील श्री.फुले घर ते तन्ना घर पर्यंत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे 20 लक्ष असा एकूण 60 लक्ष तर लोणंद नगरपंचायत मधीलप्रभाग क्रमांक 9 मंदार दुरगुडे ते महादेव मंदिर रस्ता खेमवती नदी बंदिस्त गटर्स व कॉंक्रिटीकरण करणे 15 लक्ष, प्रभाग क्रमांक 12 मधील घाडगे कॉलनी भिंत ते रावळ घर बंदिस्त गटर्स व कॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष, प्रभाग क्रमांक 11 खताल सर घर ते चव्हाण सर घर बंदिस्त गटर्स व कॉंक्रिटीकरण करणे 10 लक्ष, प्रभाग क्रमांक 10 मधील किरण खरात घर ते बबन खरात घर येथे घटक व सिमेंट कॉंक्रेट रस्ता करणे 10 लक्ष असा एकूण 40 लक्ष निधी मंजूर झाला आहे.खा. श्रीनिवास पाटील यांनी नगरपरिषद व नगरपंचायतीच्या कामांना गति मिळावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे पत्रव्यवहार करून निधी मंजूर करण्याची विनंती केली होती. त्यानुसार हा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली.