
दैनिक स्थैर्य | दि. 02 एप्रिल 2025 | कोळकी | कोळकी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाला समृद्ध आणि विकसित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कोळकी जिल्हा परिषद गटाचे नेते जयकुमार शिंदे पुढे सरसावले आहेत. ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा करून शिंदे यांनी सुमारे ४९ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे, अशी माहिती युवा नेते उदयसिंह (बबलु) निंबाळकर यांनी दिली आहे. यापूर्वीही गावात सोलार प्रकल्प तसेच पाणीपुरवठा योजना प्रभावीपणे राबवण्यात शिंदे यांच्या नेतृत्वाने आपले कसब दाखवले होते.
कोळकी गावासाठी भारतीय जनता पार्टीचे कोळकी जिल्हा परिषद गटाचे नेते जयकुमार शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कोळकी गावातील विविध विकासकामांसाठी तब्बल 50 लाखांची विकासकामे मंजूर झाली असल्याची माहिती युवा नेते उदयसिंह (बबलु) निंबाळकर यांनी दिली. कोळकी गावासाठी मंजूर झालेल्या निधीबाबत एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून भाजपाचे युवा नेते उदयसिंह (बबलु) निंबाळकर यांनी माहिती दिली.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात निंबाळकर म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे कोळकी जिल्हा परिषद गटाचे नेते जयकुमार शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोळकी गावातील विविध विकासकामांसाठी तब्बल 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये कोळकी जिल्हा परिषद गटाचे नेते जयकुमार शिंदे यांनी ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला व कोळकी गावासाठी निधी मंजूर करून आणला आहे, असे सुद्धा निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.
- कोळकी गावासाठी बँक ऑफ महाराष्ट्र ते सावतामाळी नगर बंदिस्त गटार करण्यासाठी 10 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
- कोळकी येथील असणाऱ्या पुनर्वसन भागामध्ये रस्ता करण्यासाठी 10 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
- जाधववस्ती येथे बंदिस्त गटार करण्यासाठी 10 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
- रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 9 लाख 50 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
- अजितनगर येथील रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी 9 लाख 47 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सदरील निधी मंजूर करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील व स्वराज सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर यांचे सुद्धा सहकार्य जयकुमार शिंदे यांना लाभले आहे.