श्रीमंत रामराजे व आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रयत्नांतून ४९.९० कोटी रूपयांचा निधी मंजूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १९ जुलै २०२३ | फलटण | राज्य मंत्रिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण-कोरेगाव मतदारसंघातील विकासा कामांसाठी ४९.९० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी भरघोस असा निधी दिल्याबद्दल आमदार दीपक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत.

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मंजूर विकासकामे आणि त्यांचा निधी पुढीलप्रमाणे –

  1. एसएच ११७ ते आदर्की मिरगाव फलटण रोड एसएच १४९ किमीपर्यंत सुधारणा. २६/४०० ते २९/८०० भाग रिंगरोड वाठार निंबाळकर फाटा ते वडजल ता. फलटण जि. सातारा – २.५० कोटी
  2. जिंती साखरवाडी बडेखान नंदल मुळीकवाडी बीबी वाघोशी ताथवडा दर्याचीवाडी गिरवई रोड एमडीआर ८ कि.मी. ४/०० ते ५/०० साखरवाडी जवळ ते गाव ता. फलटण जि. सातारा – १.०० कोटी
  3. एमडीआर ७ ते पवारवाडी हणमंतवाडी मुंजवडी राजुरी कुरवली बु. मध्ये सुधारणा. अंद्रुड जावळी ते एमडीआर १३ रोड एमडीआर ८९ किमी. ६/०० ते ११/०० भाग हणमंतवाडी ते एमएसएच ९६५ ता. फलटण जि. सातारा – ३.०० कोटी
  4. एमडीआर ६ ते मुरूम पिंपळवाडी फडतरवाडी ते एमडीआर १० रोड एमडीआर १०६ किमी मध्ये सुधारणा. ७/०० ते १०/०० भाग फडतरवाडी फाटा ते फडतरवाडी ता. फलटण जि. सातारा – २.०० कोटी
  5. लोणंद मार्केट कमिटी कापडगाव चव्हाणवाडी आरडगाव हिंगणगाव आदर्की ते एसएच १४९ रस्ता २ स्लॅब ड्रेनेसह कि.मी. ३/७०० आणि ३/९००, रोड किमी. ६/२०० ते ७/०० भाग चव्हाणवाडी ते चांभारवाडी फाटा ता. फलटण जि. सातारा – २.०० कोटी
  6. सुधारणा नांदळ सुरवाडी पिंपळवाडी होळ रोड एमडीआर १२ किमी. ०/०० ते ३/०० भाग नांदल ते सुरवडी ता. फलटण जि. सातारा – २.५० कोटी
  7. सुधारणा व रुंदीकरण जिंती साखरवाडी बडेखान नंदल मुळीकवाडी बीबी वाघोशी ताथवडा दर्याचीवाडी गिरवई रोड एमडीआर ८ किमी.१७/०० ते २२/५०० भाग नांदल ते मुळीकवाडी फाटा ता. फलटण जि. सातारा – ४.५० कोटी
  8. जिंती साखरवाडी बडेखान नंदल मुळीकवाडी बीबी वाघोशी ताथवडा दर्याचीवाडी गिरवई रोड एमडीआर ८ किमी.५०/०० ते ५२/०० बोडकेवाडी जवळ ते गिरवी ता. फलटण जि. सातारा – २.०० कोटी
  9. एमडीआर ९ ते फडतरवाडी सोमंथली (जुनी रेल्वे लाईन) ते एमडीआर ८७ रोड एमडीआर १०९ किमी मध्ये सुधारणा. १५/५०० ते १६/५०० ता. फलटण जि. सातारा – १.०० कोटी
  10. प्रस्तावित एमडीआर ते सासकल भादली बु. मध्ये सुधारणा आणि रुंदीकरण. सोनवडी बु. विडणी सांगवी रोड एमडीआर ८८ किमी. २५/०० ते २८/०० भाग एमडीआर ७ ते सांगवी ता. फलटण जि. सातारा – २.५० कोटी
  11. एमडीआर १३ ते मिरढे बरड निंबाळक टाकळवाडा राजळे रोड एमडीआर ९० किमी मध्ये सुधारणा. ०/०० ते ५/०० भाग मिरढे ते बरड ता. फलटण जि. सातारा – २.५० कोटी
  12. तरडगाव कि.मी.जवळ लघु पुलाचे बांधकाम. ०/२०० तरडगाव रावडी रोड वर १३ ता. फलटण जि. सातारा – २.५० कोटी
  13. गुणवारे बरड रोड कि.मी.ची सुधारणा. ०/०० ते ३/०० व्हीआर ११७ ता. फलटण जि. सातारा – २.०० कोटी
  14. एमएसएच १५ दुग्ध संघ ते ताम माळ ते फलटण मध्ये सुधारणा, पुसेगाव औंध रोड तठ २४८ किमी. ०/५०० ते ३/०० ता. फलटण जि. सातारा – २.०० कोटी
  15. कापडगाव चव्हाणवाडी चांभारवाडी फाटा रस्ता व्हीआर – ३०२ किमी सुधारणा. ०/०० ते ३/०० ता. फलटण जि. सातारा – २.०० कोटी
  16. पोलादपूर महाबळेश्वर वाई वाठार भाडाळे रोड एसएच १३९ किमी.९५/५०० ते १००/०० (विभाग- सर्कलवाडी ते पिंपोडे बीके) पर्यंत सीडी कामे आणि पुलांचे रुंदीकरण आणि पुनर्बांधणी सुधारणा. ता. कोरेगाव जि. सातारा – ४.०० कोटी
  17. एसएच १३९ ते जुनी दस्तुरी चव्हाणेश्वर सोनके रस्त्याची सुधारणा, ओडीआर ६८ किमी.१३/०० ते १५/५०० (विभाग- करंजखोप ते सोनके) ता- कोरेगाव जि- सातारा – २.३० कोटी
  18. सोळशी करंजखोप सर्कलवाडी अनपटवाडी दहिगाव येथे सुधारणा, वाठार स्टेशन रोड ओडीआर ६९ किमी.२३/०० ते २६/०० (विभाग- दहिगाव ते वाठार स्टेशन) ता- कोरेगाव जि- सातारा – २.३० कोटी
  19. देऊर आसनगाव रस्त्याची सुधारणा व्हीआर ३४ कि.मी. ०/०० ते ३/०० (विभाग- देऊर ते आसनगाव) ता- कोरेगाव जि- सातारा – २.३० कोटी
  20. सुरूर वहागाव रणदुल्लाबाद नांदवळ पाडळी रस्त्याची सुधारणा एमडीआर २० कि.मी. ६/०० ते १३/५०० (विभाग- रणदुल्लाबाद ते नांदवळ) ता- कोरेगाव जि- सातारा – २.५० कोटी
  21. सोळशी करंजखोप सर्कलवाडी अनपटवाडी दहिगाव वाठार स्टेशन रोड एमडीआर ६९ किमी.०/०० ते ६/०० पर्यंत सुधारणा (विभाग- सोळशी ते करंजखोप) ता- कोरेगाव जि- सातारा – २.५० कोटी.

एकूण निधी मंजूर – ४९.९० कोटी रूपये

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये सरकारमध्ये सामील झाल्यानंतर फलटण कोरेगाव-विधानसभा मतदारसंघासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण-कोरेगाव मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना निधी उपलब्ध करून देऊन ही कामे मार्गी लावली आहेत.

आगामी काळामध्येही फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सातारा जिल्ह्याचे नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये भरघोस निधी मिळणार आहे, अशी ग्वाही आमदार दीपक चव्हाण यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!