स्थैर्य, फलटण : येथील सांस्कृतिक भवन साठी महाराष्ट्र शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून रुपये दोन कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. सदरील निधी कोरोनाच्या कालावधीमध्ये कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी किंवा कोरोना नियंत्रित करण्याकरिता येणाऱ्या उपाययोजनांसाठी वर्ग करण्यात यावा अशी मागणी, नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेली आहे.
सध्या फलटण शहरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून रोज नव्याने कोरोनाबाधितांची भर पडत आहे. तरी अशा परिस्थितीमध्ये कोरोनाबाधितांवर योग्य ते उपचार होण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी मंजूर झालेला आहे. तो निधी सद्यस्थितीत कोरोना बाधितांवर उपचारासाठी व कोरोना नियंत्रणासाठी वर्ग करण्यात यावा, अशी मागणी फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेली आहे.