निरगुडी ग्रामपंचायतीला १४ लाख ८२ हजारांचा निधी मंजूर; गावात विकासकामांचा धडाका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ एप्रिल २०२३ | फलटण |
निरगुडी ग्रामपंचायतीच्या वतीने दि. १७ एप्रिल २०२३ रोजी १५ वित्त आयोग व ग्रामनिधी मधून १४ लाख ८२ हजार निधी मंजूर करून त्यामधून उद्घाटन व भूमिपूजन सोहळा पार पाडला. त्यामध्ये इलेक्ट्रिकल घंटागाडीचे लोकार्पण निरगुडीतील दिव्यांग व्यक्तीच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आरवो वॉटर प्लांट भूमिपूजन, अंगणवाडी समोरील पेवर ब्लॉक भूमिपूजन, मांडव-खडक भुयारी गटर, जिल्हा परिषद शाळा दुरूस्ती, फॉगिंग मशीन, ग्रास कटर, जिल्हा परिषद शाळेसाठी स्मार्ट टीव्ही, कॉम्प्युटर आणि पंधरा टक्के ग्रामनिधीतून साऊंड सिस्टिम, फर्निचर, भांडी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कामांचे भूमिपूजन निरगुडीमधील ज्येष्ठ नागरिक, महिला व निरगुडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. कोमल सचिन सस्ते, उपसरपंच सौ. सारिका महावीर बनसोडे, सदस्य श्री. शाहूराज काशिनाथ सस्ते, श्री. सिकंदर बाळू जाधव, श्री. रमेश मोतीलाल निकाळजे, सौ. मंगल वामन जाधव, सौ. दिपाली दिपक मदने व निरगुडीतील सर्व ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या वेळेस १८ डिसेंबर २०२२ रोजी १८ लाख ५२ हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यामधील संपूर्ण कामे मार्गी लागून पूर्ण होण्याच्या प्रगतीपथावर आहेत.

दरम्यान, निरगुडी गावचे सुपुत्र अक्षय अनिलकुमार खुडे यांची सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजरपदी निवड झाल्याबद्दल यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

‘माझं गाव, माझा अभिमान’ हे ब्रीद घेऊन निरगुडी ग्रामपंचायतीची सध्या वाटचाल असून ग्रामपंचायतीने विकासकामांचा धडाका लावला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या जास्तीत जास्त योजना गावात राबविण्याचा संकल्प निरगुडी ग्रामपंचायतीने केल्याचे सध्या गावात चाललेल्या विकासकामांवरून स्पष्ट होत आहे.


Back to top button
Don`t copy text!