कार्यगौरव लेख : प्राचार्य डॉ. मायप्पा बाबूराव वाघमोडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 31 : प्राचार्य डॉ. मायप्पा बाबूराव वाघमोडे यांचा जन्म मु.पो. रेवलतात्र जत जि. सांगली येथील एका खेडेगावातश्री बाबूराव तातोबा वाघमोड यांच्या व सौ. पारूबाई बाबूराव वाघमोडे अत्यंत गरीब आर्थिक परिस्थिती अल्पभूधारक शेतक-याच्या घरी जन्म झाला. अंत्यत कष्टाने चिकाटीने जीवन जगत असताना आपल्या मुलाना चांगले शिक्षण घेण्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करीत असत.

पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण वाघमोडेवाडी खेताळ येथील शाळेत झाले तेथे कुलकर्णी गुरूजी शिकवत होते. त्याच्या घरी जळण पाणी आणून देण्याचे काम करून शिक्षण घेतलेत्या शाळेत श्री गावढे गुरूजी होते. त्यानी शिस्त, संयम, अभ्यास, प्रामाणिकपणा यासबंधी धडे दिले शिक्षणाचा पाया भक्कम झाला होता.

पाचवी ते सातवीपर्यतचे शिक्षण शेजारच्या चार कि.मी अतरावर तिटणेहक्की या गावी झाले. त्या शाळेत स्वातंत्र्य सेनानी श्री शिंदे गुरूजी म्हणून शिक्षक शिकवायला होते. त्यामुळे त्या शाळेतील विद्यार्थी त्या शिक्षकाच्या ज्ञानाशिवाय व कामा विषयी प्रस्तावित झालेले होते. शिंदे गुरूजीनी शिक्षण हे अत्यंत महत्वाचे आहे. असे विद्यार्थ्याच्या मनात बिंबविले होते. त्याचप्रमाणे शिंदे गुरूजीची भिती पण फार होती. टेबलावर हात ठेवून वरून काठीने मारत असत त्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थी संयमी अभ्यासू बनलो होतो. सातवी केंद्रपरीक्षा होती. त्यामुळे केंद्रपरीक्षा पास होणे अत्यंत महत्वाचे होते. केंद्र परीक्षा पास झाले पण पुढे शिक्षणाचे काय असा प्रश्न व अडचण निर्माण झाली स्वातंत्र्य  सेनानी शिंदे गुरूजीनी श्री स्वामी गुरूजीची आश्रम शाळा आहे. तेथे प्रवेश घेणे व आठवी ते दाहवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण करणे असा आदेश

आठवीच्या वर्गात प्रवेश दिला या हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना पांढरा हाफ शर्ट व हाफपँट ड्रेसकोड होता. आमच्याकडे फक्त एकच ड्रेस  होता त्यामुळे तीन दिवसातून स्वत: धुणे आणि शाळेत तो घालून जाणे हा दिनक्रम होता. आश्रम शाळेत राहणे जेवण व पुस्तके मोफत दिली जात असत त्यामुळे माझे आठवी ते दाहवी पर्यंतचे त्या शाळेतील शिक्षण पुर्णझाले. त्यानंतर 11 वी बोर्डपरीक्ष होती.

11वी वर्गात एस. आर. व्ही. एम हायस्कूल जत या हायस्कूलचे प्रवेश दिला तेथे श्री. आर. बी पाटील मुख्यधपक होते. पण स्वातंत्र्य  सेनानी शिक्षक होते ते पण स्वातत्र सेनानी शिक्षक होते. त्यामुळे त्या हायस्कूलची शिस्त फार मोठी होती. आम्ही विद्यार्थी सात कि.मी अतरावरून सकाळी व सध्याकाळी चालत जात होतो. त्यामुळे नेहमी पाच ते दहा मिनटे वेळ होतअसेत्याच्याकडे मोठी अशी लाकडी दाडयाची छत्री होती. त्या छत्रीनेच मारत असत चालत जाणे त्यामुळे नेहमी थकवा येत असे त्यामुळे दिव्याच्या प्रकाशामध्ये अभ्यास करवा लगत असे छोठयाशा दिव्याच्या प्रकाशात अभ्यासकरणे अडचणी होतअसे. परंतु अभ्यासकरणे आवश्यक होते अशा अडचणीतून 11 वी बोर्ड परीक्षा पास होणे अत्यंत महत्त्वाचे होते. नेहमी फस्टकाल्स व सेंकडक्लासमध्ये पास होत असे आकरावी परीक्षा पास झाल्यानंतर कॉलेजशिक्षण घेणे कठीण होते म्हणून सौनिक भरतीसाठी जत येथे गेलो होतो म्हणून सौनिकभरती झााली परंतु आईने मला जाऊ दिले नाही. पोलिसवाँरट घेऊन घरी आले तेव्हा एक दिवस झाडावर लपून न दिसता बसलो होतो. सौनिकामध्ये जाणे रदद झाले माझे बाकीचे मित्र  भरती होऊन गेले होते.

राजेरामराव महाविद्यालय जत हे स्वामी विवेकानंद सस्थेचे कॉलेज होते. त्या कॉलेजमध्ये खेळाचे शिक्षक प्रा. वसतराव जाधव हे होते त्यांनी मला स्पर्धेमध्ये भाग घेणार आसल तरी फी माफी व इतरसवलतीबाबत लंडन रिटर्न प्राचार्य शामराव चव्हाण यांना बोलतो असेम्हणाले मी दुस-या दिवशी कॉलेजमध्ये जाऊन प्राचार्य साहेबाची व जाधवसराची भेट घेतली कबडी आणि कुस्ती या खेळामध्ये भाग घेतला पी. डी आटर्स या वर्गात प्रवेश घेतला आणि झोनल विभागामध्ये प्रथम क्रंमाक व इंटरझोनल मध्ये ततीय क्रंमाक मिळवला त्यामुळे पुढचे शिक्षणासाठी फी सवलत व ई.बी.सी सवलत मिळत होती त्यामुळे बी. ए अर्थशास्त्र प्राचार्य चव्हाणसाहेबामुळे घेतलाआणि बी. ए अर्थशास्त्र विषय घेवून सेंकड बी प्लसक्लास मिळून पास झालो कॉलेज छण्ैण्ै व छण्ब्ण्ब् मध्ये भाग घेतला आणि त्यामुळे पण प्राध्यपक वर्गाचा बघण्याचा द़ृष्टीकोन चांगला होता एन.सी.सी बी सर्टीफिकेट पास झालो होतो त्यामुळे बी. ए नंतर पोलिस भरती घेण्याचा निर्णय घेतला पण त्याकाळात पुढारीवर्ग शिफारसपत्र मिळाले नाही.

बी.ए अर्थशास्त्र विषयात कॉलेजध्ये पहीला होतो प्राचार्य चव्हाणसाहेबानी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे प्रवेश घेण्या विषयी मदत केली जमसस्थनाचे डफळे सरकार यांनी कुलसचिव सौ उषा ईथापे यांना पत्र दिले यांना एम. ए. या वर्गात प्रवेश दिला व कमवा शिकवा या योजनेत प्रेसमध्ये एक वर्ष काम दिले व नंतर दुस-या वर्षी ग्रंथालयात नाईट वॉचमन पुस्तके देण्यासाठी काम दिले त्यामुळे मी चांगलाअभ्यास करून खुप ग्रथांलयातील पुस्तकाचा वापर करता आला व एम. ए. अर्थशास्त्र विषयातून बी प्लस डीग्री झाली.

बी. ए पर्यंतमराठी भाषेतून अर्थशास्त्र विषय शिकविला जात होता एम. ए ला इंग्रजी माध्यमातून त्यामुळे खुप त्रास झाला पण डीग्री पूर्ण केली

एम. ए रिझल्ट मिळाल्यानंतर कणकवली कॉलेज कणकवली येथे अर्ज केले तेथे निवड झाली त्यामुळे सातारा येथे निवड झाली त्यामुळे सातारा येथे राहणे पंसत केले 1-08-1981 रोजी सातारा कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे हजर झालो सस्थेचे पदाधीकारी व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे या महाविद्यालयात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले.

कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख म्हणून चौदा वर्ष काम केले. त्यामुळे मला कै. आर. आर. (आबा) पाटील ग्राम विकास मंत्री होते. त्यांनी ग्राम स्वच्छता अभियान मध्ये परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे स्वच्छता अभियानामध्ये चांगले काम करता आले.

सातारा जिल्ह्याचे एस. पी. खोपडे साहेब होते त्यांनी पोलीस मित्रांसाठी कार्यशाळा सुरु केली होती, त्या कार्यशाळेचा मार्गदर्शक म्हणून संघी मिळाली “मानवी जीवन आणि बचत” या विषयावर सहा वर्ष काम करता आले. त्याच काळात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील अर्थशास्त अभ्यास मंडळावर निवड झालेली होती. त्या ठिकाणीपण नवीन अभयसक्रम प्रश्न पत्रिका स्वरूप मुक्त शिक्षण अभ्यासक्रम या मध्ये चांगला काम करता आले. काला व वाणिज्य महाविद्यालय उत्कृष्ट वाचक शिक्षक पुरस्कार हि मिळालेला आहे.

कला व वाणिज्य महाविद्यालयात २९मी वर्ष सेवा झाल्यानंतर ३ ऑगस्ट २०१० रोजी आ. शशिकांत शिंदे साहेबांच्या मेधा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्राचार्य या पदावर शिंदे साहेबांनी काम करण्याची संधी दिली. प्रथम त्या महाविद्यालयाचे आ. शशिकांत शिंदे महाविद्यालय असे नामकरण करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि तो साहबांनी मान्य केला. त्यामुळे काम करण्याचा उत्सव वाढला. नंतर महाविद्यालयाच्या इमारतीचे उदघाटन कार्यक्रम घेतला. त्यावेळी मा. ना. अजितदादा पवार, मा. ना. रामराजे नाईक निंबाळकर, मा. ना राजेश टोपे, मा. शशिकांत शिंदे साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते उदघाटन समारंभ झाला. त्यानंतर उत्सव वाढला व त्या महाविद्यालयात नव्याने विज्ञान शाखा सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला तो शिंदे साहेबानी मंजूर केला. आता त्या महाविद्यालयात कला वाणिज्य व विज्ञान शाखांतून शिक्षण दिले जात आहे.

या महाविद्यालयाला कायम स्वरूपी मान्यता विद्यापीठाकडून मिळवली. त्यासाठी बी.सी.यु.डी. डायरेक्टर प्रा. डॉ. राजगेसाहेबानी खूप सहकार्या केले. यु.जी.सी. कडून १२वी व २ एक ची मान्यता घेतली आणि महाविद्यालयाच्या कामकाजाला एक वेगळेच चांगले वळण लागले. त्यामुळे महाविद्यालयाला NAC संस्थांकडून बी+ ग्रेड मार्क देऊन मुळक्यानं झाले. आता महाविद्यालयांना सरकारी यु.जि.सी. केउन अनुदान व सवलती मिळवता येतात. शशिकांत शिंदे साहेबांच्या कॉलेजवर काम करत असताना साहबांचे नाव माझे काम (कार्य) व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य यामुळे उत्कृष्ट काम झालेले आहे. तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या स्थायी समितीचे सदस्य म्हणून पाच वर्ष काम करता आले. अनेक महाविद्यालयाच्या प्राचार्य पदांच्या निवड समितीवर करता आले तसेच प्राद्यापक निवड समितीवर हि काम करता आले तसेच अनेक महाविद्यालयाच्या सलग्नीकरणाच्या समितीवर काम करता आले.

मुक्त विद्यापीठ अभ्यासू कामाच्या पुस्तकाचे लेखन करता आले. बी.ए., बी.कॉम. एम.ए. एम.कॉम. या वर्गाचे अभ्यासक्रम पुस्तके लेखन संपादन करता आले. महाविद्यालयात प्राचार्य पदावर काम करीत असताना प्रा. डॉ. प्रमोद घाटगे व सह-प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. मा. ना. शशिकांत शिंदेसाहेब संस्थच्या सचिव सौ. वैशाली शशिकांत शिंदे वाहिनीसाहेब अशोकराव नवले, दादासाहेब शिंदे, राहुलभाई जगताप, ऋषिकांत शिंदे यांचे खूप चांगले मार्गदर्शन लाभले. त्यामुळे प्राचार्य म्हणून खूप चांगले काम करता आले.

या सर्व जीवन प्रीच्यामध्ये माझे वडील व आई यांची मोलाची पाठीवरती थाप व आशीर्वाद यामुळे येथील क्षेत्रात काम करता आले. आई वडिलांच्या त्यागामुळे व आशीर्वादामुळे प्राचार्य पदापर्यंत या शिक्षण क्षेत्रात काम करता आले.

प्राध्यापक आणि प्राचार्य या कालावधीत काम करीत असताना माझ्या सौ. शारदा पत्नीची फार मदत झालेली आहे. मुलांचे शिक्षण त्यांचे संगोपन करण्याची पूर्ण जबाबदारी तिची होती. तसेच या विकासाच्या वाटेत तिचा खूप मोठा वाट आहे. राष्ट्रीय सेवा योजना शिबीर १० दिवसांचे चौदा वर्षे काम करीत असताना तेथे मुक्काम करावा लागत असे तरी तिने सर्व घरातील जबाबदारी स्वकारलेली होती. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी तिची होती. माझ्या मुलांचे शिक्षण पण त्यांच्या आवडीनुसार झाले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ दिलेली नाही. माझी मुले पण त्यांच्या कार्य क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत.

आई वडिलांचा आशीर्वाद पत्नीचे सहकार्य मित्राचे पाठबळ मुलांचे सहकार्य इतर मित्र परिवाराचे मार्गदर्शन शुभेच्छा यामुळे हा जीवनाचा परिपाठ पूर्ण झेलला आहे. आता नवीन निवृत्तीच्या क्षेत्रात प्रवेश करीत आहे.

प्रा. डॉ. एम. बी. वाघमोडे, आ. शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा, ता. जावली 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!