
दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२२ । सातारा । गेल्या दहा वर्षांपासून पाेलीसांना विविध गुन्ह्यांत हवा असलेल्या आराेपीस अटक करण्यात आज (गुरुवार) सातारा पाेलीस दलाच्या स्थानिक गु्न्हे शाखेस यश आले आहे. संशयित आराेपीचे नाव संजय नमण्या पवार असे असून त्याच्यावर एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. तसेच पाच गंभीर गुन्ह्यात ताे गेल्या दहा वर्षांपासून फरार हाेता.
संजय नमण्या पवार हा सासवड झणझणे (ता. फलटण) येथील माळीबेन वस्ती वडाचा मळा येथे असल्याची माहिती फलटण ग्रामीण पाेलीसांना मिळाली हाेती. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी गेलेल्या अंमलदार आणि पाेलीसांवर त्याने दगडफेक करुन तलावर व काेयत्याने तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला हाेता. त्याबाबत त्याच्या खूनाचा गुन्हा नाेंदविण्यात आला हाेता. त्यानंतरही त्याने सातारा जिल्ह्यात विविध गुन्हे केले हाेते. त्याच्यावर सन 2012 पासून जिल्ह्यातील लाेणंद, खंडाळा, फलटण ग्रामीण आदी ठिकाणी खून, खूनाचा प्रयत्न, दराेडा असे विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल हाेते.
सातारा पाेलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेस संजय नमण्या पवार यास भुरकरवाडी गावाच्या परिसरात शस्त्रांसह असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार आज (गुरुवार) पाेलीसांनी घटनास्थळी जाऊन त्यास सापळा लावूऩ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने एलसीबीच्या पथकावर हल्ला चढवला. पाेलीसांनी त्यांच्या जिवाची परवा न करता त्यास अत्यंत शिताफीने पकडले. त्याच्यावर या हल्ला संदर्भात लाेणंद पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.