स्थैर्य, सातारा, दि 06 : एल.सी.बी.कडून वडुज, पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत दरोडे,जबरी चोरी,घरफोडी चोरीचे गुन्हे उघड तसेच ५६ घरफोडीच्या गुन्यात फरार असलेला गुन्हेगार सातारा एल.सी.बी.कडुन जेरबंद.
वडुज, पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये काही दिवसापुर्वी दरोडा, जबरी चोरी व घरफोडी चोरीचे गंभीर गुन्हे सातत्याने घडत होते. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणून त्यामधील आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याच्या सुचना दिलेल्या होत्या, त्याअनुशंगाने सर्जेराव पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक तयार करुन संशयित आरोपींचा शोध घेवून गुन्हे उघड करण्याबाबत आदेशित दिले होते.
आज पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गोपनिय माहिती प्राप्त झाली की, वडूज, पुसेगाव पोलीस ठाणे हदीत दरोडे, जबरी चोरी व घरफोडी चोरीमधील फरारी आरोपी हा नेर ता.खटाव परिसरामध्ये वावरत आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांचे पथक हे पुसेगाव परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळाले गोपनिय माहितीमधील आरोपीस ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. पथकाने तात्काळ पुसेगाव, नेर, फडतरवाडी ता.साटाय परिसरामध्ये जावून संशयित आरोपी असलेल्या ठिकाणी सापळा लावला, संशयीत आरोपीने पोलीस आल्याची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतू पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास शिताफिने ताब्यात घेवून त्याचेकडे सखोल विचारपुस केली असता त्याने वडुज, पुसेगाव येथे मागील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये साथिदारांसह दरोडे, जबरी चोरी व घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व श्री.धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे सुचनांप्रमाणे सर्जेराव पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, स.फौ. जोतिराम बर्गे, पो. हवा. तानाजी माने, संतोष पवार, पो.ना.विजय कांबणे, शरद बेबले, मुनीर मुल्ला, अजित कणे, निलेश काटकर, सहा.पो. ना. संजय जाधव, विजय सावंत यांनी सहभाग घेतला आहे. कारवाईमधील सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सातारा व धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंदन केले आहे.