एफटीआयआय : चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, पुणे, दि.२९: चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची भारतीय फिल्म और टेलिविजन संस्था (एफटीआयआय) च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच, त्यांना गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची जबाबदारीदेखील देण्यात आली आहे. मंगळवारी माहिती आणि प्रसारण मंत्रालायाकडून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

संस्थेचे संचालक भूपेंद्र कंठौला म्हणाले की माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कपूर यांची या पदांवर नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. कपूर यांचा कार्यकाळ मार्च, 2023 पर्यंत असेल.

6 डिसेंबर 1945 ला पाकिस्तानच्या लाहौरमध्ये जन्म झालेल्या शेखर कपूर यांनी आपल्या करिअरमध्ये अनिल कपूरच्या ‘मिस्टर इंडीया’ आणि ‘मासूम’सारख्या हीट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच, ‘एलिजाबेथ’ (1998), ‘बँडिट क्वीन’ (1994) आणि ‘द फोर फीदर्स’ (2002) सारख्या चित्रपटातून त्यांनी जगभर ओळख मिळवली. ‘एलिजाबेथ’ चित्रपटासाठी त्यांना ऑस्करमध्ये नॉमिनेशन मिळाले होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!