
दैनिक स्थैर्य | दि. १३ फेब्रुवारी २०२५ | फलटण | फलटण शहर पोलीस ठाणे अंतर्गत एक गंभीर गुन्हा घडल्याची बाब समोर आली आहे. दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास, फलटण पंचायत समिती गेटचे समोर रस्त्यावर एक इसम लोखंडी तलवार बाळगून मिळुन आल्याची घटना घडली.
फिर्यादी संदिप दिलीप लोंढे, पो.हवा. नेमणुक, फलटण शहर पोलीस ठाणे, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी परवेज समिर पठाण, वय 23 वर्षे, रा. बादशाही मस्जिदचे पाठीमागे, कसबा पेठ, फलटण, लोखंडी तलवार बाळगून पंचायत समिती समोर रस्त्यावर मिळुन आला. या घटनेची नोंद पोलीस ठाणे अंतर्गत प्रथम खबर नं. 54/2025 म्हणून दाखल करण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षक अनिल भोसले, नेमणूक – फलटण शहर पोलीस ठाणे, यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.