स्थैर्य, सातारा, दि.२५: फळ घेतल्यानंतर त्याचे पैसे मागितल्याने चिडून जाऊन तडीपार गुंड व त्याच्या साथीदारांनी फळ विक्रेत्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पिल्या राजू नलवडे (रा मंगळवार पेठ बोगदा परिसर सातारा) त्याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना वर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,
पिल्या नलवडे याला गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तडीपार केले असतानाही गोंधळ घातल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिल्या नलवडे व त्याचे दोन अनोळखी साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी रहिमान राजू बागवान (वय ३४, रा.मंगळवार पेठ) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
ही घटना दि. २३ रोजी घडली. तक्रारदार बागवान यांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. संशयितांनी बागवान यांच्याकडून फळे घेतल्यानंतर त्यांनी त्याचे पैसे मागितले. यावरुन चिडून जावून संशयितांनी लाकडी दांडके, दगडाने मारहाण केली. या सर्व घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
संशयितांनी तक्रारदार यांना मारहाण केल्यानंतर तेथून ते पसार झाले. या घटनेत तक्रारदार जखमी झाले असून शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला.