नवरात्रोत्सवामुळे सातार्‍यात फळांचे दर वधारले


स्थैर्य, सातारा, दि. 23 सप्टेंबर : नवरात्रात होणार्‍या व्रतवैकल्यांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ठरणार्‍या फळांची सातार्‍यातील बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. आवक वाढली असली तरी मागणी जास्त असल्यामुळे दरात चांगलीच वाढ झाली आहे.महिला वर्ग नवरात्रामध्ये मोठ्या प्रमाणात आराधना करत असतात. नऊ दिवस व्रतवैकल्ये आणि उपवास करण्यावर महिलांचा भर असतो. या काळात फळांचे सेवन करण्यात येत असल्याने सफरचंद, रताळी, केळी व इतर फळांची न मोठ्या प्रमाणात सातार्‍यातील बाजारात आवक झाली आहे. मागणी जास्तअसल्याने सफरचंद प्रतवारीनुसार दीडशे रुपयांच्या घरात विकले जात होते. केळीचे दर 50 ते 60, तर रताळ्याची विक्री देखील 60 ते 100 रुपयांच्या घरात होत होती. यासह इतर फळेदेखील मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत. फराळाच्या साहित्याची मागणी देखील वाढली असून, त्यांचे दर स्थिर आहेत. सातार्‍यातील बाजारात सीताफळाची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले.

आवक जास्त असली तरी त्याची विक्री प्रतवारीनुसार 70 ते 100 रुपये किलोप्रमाणे होत होती. पावसाने उघडीप दिल्याने मटार, घेवड्यासह इतर भाज्यांची आवक देखील वाढली आहे. देशी मटाराचे प्रतिकिलो 160 ते 200 रुपयांच्या घरात होते. मेथी, शेपू, पोकळ्याच्या पेंडीचे दर रविवारी 30 रुपयांच्या घरात होते. नवरात्रातील पहिल्या माळेसाठी खाऊची पाने (नागवेली) आवश्यक असल्याने त्यांची खरेदी देखील सातारकरांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती.


Back to top button
Don`t copy text!