नगराध्यक्ष समशेरसिंह यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात फळे वाटप; सागर तेली यांचा स्तुत्य सामाजिक उपक्रम


फलटणचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सागर तेली यांच्या वतीने येथील वृद्धाश्रमात फळवाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अनुप शहा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

स्थैर्य, फलटण, दि. २८ मार्च : फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात कार्यकर्त्यांकडून आणि हितचिंतकांकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर सागर तेली यांच्या पुढाकाराने फलटण येथील वृद्धाश्रमात आजी-आजोबांना फळांचे वाटप करण्यात आले.

या स्तुत्य आणि सामाजिक उपक्रमावेळी फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अनुप शहा, शगीर शेख आणि रियाज इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही मोठा आणि खर्चिक उत्सव साजरा न करता, समाजातील गरजू आणि वृद्धांना मदत करण्याच्या उदात्त हेतूने सागर तेली यांनी हा फळवाटपाचा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृद्धाश्रमातील सर्व आजी-आजोबांना फळे देण्यात आली.

या छोटेखानी परंतु अत्यंत भावस्पर्शी उपक्रमाने वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला. फळे स्वीकारताना त्यांनी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना निरोगी आणि उदंड आयुष्याच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या कृतज्ञतापूर्ण उपक्रमाबद्दल सागर तेली आणि उपस्थित मान्यवरांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!