
स्थैर्य, फलटण : वेळापूर येथील श्री आनंदमूर्ती सेवा मंडळ व महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण जन्माष्टमी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज जयंती व प पू सदगुरु श्री गजानन महाराज गुप्ते (नाशिक) यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार दि . ५ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ४ ते ५ या दरम्यान “पालखी सोहळा पत्रकार संघ” या फेसबुक पेजवर राज्यातील नामवंत संत साहित्याचे अभ्यासक संतांचे जीवन चरित्र कथन करणार आहेत.
बुधवार दि. ५ रोजी संत निवृत्तीनाथ संस्थान त्र्यंबकेश्वरचे विश्वस्थ ह भ प जयंत महाराज गोसावी – संत निवृत्तीनाथ, गुरुवार दि . ६ रोजी सासवडच्या संत साहित्याच्या अभ्यासक ह भ प श्रीमती सत्यवती एदलाबादकर – संत सोपानदेव, शुक्रवार दि . ७ रोजी मुक्ताईनगरचे संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख ह भ प रवींद्र महाराज हरणे – संत मुक्ताबाई, शनिवार दि . ८ रोजी श्री क्षेत्र पैठणचे संत एकनाथ महाराज यांचे १२ वे वंशज ह भ प योगेश महाराज गोसावी – संत एकनाथ, रविवार दि . ९ रोजी श्री क्षेत्र पंढरपूरचे संत साहित्याचे अभ्यासक ह भ प प्र . द . निकते – संत नामदेव, सोमवार दि . १० रोजी श्री क्षेत्र वेळापूरचे संत साहित्याचे अभ्यासक ह भ प स्वामीराज महाराज भिसे – संत तुकाराम, मंगळवार दिं ११ रोजी श्री क्षेत्र केजचे संत साहित्याचे अभ्यासक ह भ प समाधान महाराज शर्मा – संत ज्ञानदेव व बुधवार दि . १२ रोजी अकलूजचे संत साहित्याचे अभ्यासक ह भ प प्रमोद महाराज भास्करे – प पू सदगुरु श्री गजानन महाराज गुप्ते (नाशिक) यांचे जीवन चरित्र कथन करणार आहेत. भाविकांनी या चरित्र कथनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री आनंदमूर्ती सेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी केले आहे.