मित्रोंची ५ दशलक्ष डॉलरची निधी उभारणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, १८ : मित्रों या स्वदेशी शॉर्ट फॉर्म व्हिडिओ अॅपने नेक्सस व्हेंचर पार्टनर्सच्या नेतृत्वात ५ दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी केली आहे. या ताज्या फेरीत ३वन४ कॅपिटल आणि लेट्स व्हेंचरवरील अरुण तडंकी यांचे खासगी सिंडिकेटदेखील सहभागी होते. मित्रों अॅप हे एक शॉर्ट-फॉर्म सोशल व्हिडिओ अॅप असून ते यूझर्सना मनोरंजक शॉर्ट व्हिडिओ तयार करणे, अपलोड करणे, पाहणे आणि शेअर करण्याची सुविधा पुरवते.

ग्राहकांची गुंतवणूक वाढवणे तसेच उच्च गुणवत्तेची प्रतिभा मिळवण्यासाठी तसेच उत्पादन विकासास गती देण्यासाठी नव्या भांडवलाचा वापर कंपनी करेल. अॅपवर भारतातील प्रतिभावान निर्मात्यांचे विस्तृत नेटवर्क मिळवण्याची तसेच मित्रों ब्रँड तयार करण्यासाठी गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे.

निधीच्या ताज्या फेरीत मेकमाय ट्रिपचे अध्यक्ष दीप कालरा, पाइन लॅब्जचे सीईओ अमरीश राऊ, ज्युपिटरचे संस्थापक जितेन गुप्ता, (एमडी, स्पॉटिफाय इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अमरजित बत्रा, फेसबुक आणि स्नॅपडीलचे माजी एक्झिक्युटिव्ह आनंद चंद्रशेखरन, गूगल क्लाऊड, इंडियाचे एमडी करण बाजवा, शॉपक्लेक्सचे सह संस्थापक राधिका घई आणि लेट्सव्हेंचरचे संस्थापक शांती मोहन यांनी सहभाग नोंदवला.

मित्रोंचे संस्थापक आणि सीईओ शिवांक अग्रवाल म्हणाले, “ या प्रवासात नेक्सस व्हेंचर पार्टनर सहभागी झाल्याने आम्हाला आनंद झाला आहे. त्यांच्या पोर्टफोलिओ कंपन्यांना उत्तम उत्पादने निर्मितीत मदत करण्याचे सूक्ष्म कौशल्य आहे. डिजिटल एंटरटेनमेंट आणि एंगेजमेंटची नवी कल्पना करत, भारतीय यूझर्ससाठी मित्रोंला जागतिक दर्जाचे उत्पादन बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्ले स्टोअरवर दर महिन्याला ३३ दशलक्ष डाउनलोड्स आणि ९ अब्ज व्हिडिओ व्ह्यूज मिळवणारे मित्रों हे भारतीय शॉर्ट फॉर्म व्हिडिओसाठी लोकांच्या पसंतीस उतरत आहे. मित्रोंवरील प्रेमासाठी आम्ही यूझर्सचे आभारी आहोत.”


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!