फलटण शहरातील प्रभाग क्र.10 मध्ये मोफत लसीकरण शिबीर संपन्न


दैनिक स्थैर्य । दि. 01 ऑक्टोबर 2021 । फलटण । फलटण शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांसाठी फलटण नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मोफत कोवीड प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रभागातील जुने फेडरेशन (दगडी पूल) येथे पार पडलेल्या या शिबीराचे उद्घाटन नगरसेवक अजय माळवे व नगरसेविका सौ.सुवर्णाताई खानविलकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिबीरामध्ये जवळपास 100 नागरिकांना कोव्हिशील्ड लसीची मात्रा देण्यात आली.

यावेळी अमरसिंह खानविलकर, अनिलशेठ गांधी, राजेंद्र बेंद्रे, आरोग्य विभागाच्या सुपरवायझर कल्याणी मोटे, आरोग्य सेविका सारिका धायगुङे, किर्ती भिंगे, रुपेश इंगळे आदी उपस्थीत होते.


Back to top button
Don`t copy text!