
दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२२ । सातारा । उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) सातारा आयोजित आणि महाराष्ट्र उद्योजक व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष मुंबई यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती करिता १८ दिवसीय मोफत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आरडी डीपी पुणे येथे दि. 17 ऑगस्ट 2022 ते 3 सप्टेंबर 2022 या कालावधीत वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्ग, पुणे या ठिकाणी आयोजन केलेले आहे.
यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र एम सी डी, जिल्हा उद्योग केंद्र आवार जुनी एमआयडीसी येथे दि. 10 ऑगस्ट २०२२ रोजी प्रत्यक्ष मुलाखतीचे आयोजन दुपारी 12 वाजता करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी आधार कार्ड दोन आयडी साईज फोटो , जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स प्रत घेऊन मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन एम सी डी सातारा तर्फे करण्यात आले आहे.