दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । आळंदी । मोरया सामाजिक प्रतिष्ठान व नेहरू युवा केंद्र (भारत सरकार )यांचा उपक्रम कम्युनिटी डॉक्टर व कम्युनिटी कार्यकर्ता या संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड मधील आशा वर्कर्सना मोफत नर्सिंग प्रशिक्षण उपक्रमाचे उद्घाटन टिळक महाराष्ट्र विद्यापीठ उपाध्यक्ष डॉ. रोहितदादा टिळक व श्रीमती रेखा दुबे यांचे हस्ते आले.तसेच कोरोना कालावधीत काम करणाऱ्या डॉक्टरांचा आरोग्य क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी व्यासपीठावर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ उपाध्यक्ष डॉ. रोहितदादा टिळक, श्रीमती रेखा दुबे डायरेक्टर आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, कर्नल (रिटा.) श्री.अनिल साळुंके (समन्वयक महा.सैनिक इंडस्ट्रियल इस्टेट) मा.यशवंत माणखेडकर,(डेप्युटी डायरेक्टर नेहरू युवा केंद्र भारत सरकार) सत्कारमूर्ती डॉ.गणेश भोईर, डॉ.अभय तांबिले, डॉ. विद्याधर फल्ले, मोरया सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गणेश अंबिके, कार्याध्यक्ष डॉ.आशिषचौहान,
कार्याध्यक्ष विरेश छाजेड,सचिव धनवंत धिवर, टास्क फोर्स प्रमुख नितीन सोनावणे आदी संचालक उपस्थित होते.
कम्युनिटी डॉक्टर कम्युनिटी कार्यकर्ता राज्य संघटने तर्फे प्रथम वर्षाचा उत्कृष्ट संचालक कार्यगौरव पुरस्कार खेड तालुका कम्युनिटी डॉक्टर कम्युनिटी कार्यकर्ता संघटनेचे अध्यक्ष पत्रकार अर्जुन मेदनकर यांना अध्यक्ष डॉ.गणेश अंबिके डॉ.आशिष चौहान,विरेश छाजेड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी
टिळक महाराष्ट्र विद्यापीठास ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन भेट देण्यात आली.श्रीमती रेखा दुबे, डॉ. गणेश अंबिके, विरेश छाजेड, आशिष चौहान, सिद्धाराम रायचुरकर , नितीन सोनावणे संचालक यांचे हस्ते ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन रोहितदादा टिळक यांचेकडे सुपूर्द करण्यात आले. तत्पूर्वी संस्थेच्या झेंड्याचे अनावरण व्यासपीठावरील मान्यवरांचे हस्ते झाले.
यावेळी आशा वर्कर यांनी आपल्या कार्याची माहिती देत उपक्रमाचे कौतुक केले. डॉ. रोहितदादा टिळक यांचेसह. श्रीमती रेखा दुबे मान्यवरांनी मोरया सामाजिक प्रतिष्ठाण डॉ. गणेश अंबिके यांचे नेतृत्वात उल्लेखनीय कार्य करीत असल्याचे सांगत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
संस्थेच्या कार्याचा आढावा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गणेश अंबिके यांनी घेत उपक्रमांची तसेच आशा वर्कर यांना देण्यात येणा-या नर्सिंग प्रशिक्षणाची माहिती दिली तसेच संस्थेचे वतीने वस्ती पातळीवर आरोग्य समित्या स्थापन करण्यात येणार असून या वर्षी 500 पेक्षा जास्त आरोग्य समिती स्थापन करण्यात येणार आहेत असे माहिती दिली. प्रास्ताविक राज्य कार्याध्यक्ष विरेश छाजेड यांनी केले. सूत्रसंचालन नितीन साळी यांनी केले. प्रतिज्ञा वाचन पुणे जिल्हा अध्यक्ष धनंजय जगताप यांनी केले.या कार्यक्रमास डॉ. गणेश अंबिके, डॉ. आशीष चौहान, धनवंत धिवर, विरेश छाजेड,सिद्धाराम रायचुरकर डॉ.सरोज अंबिके,डॉ.गीता यादव, नितीन सोनवणे, विशाल गुरव, नितीन साळी, सागर पुंडे, ओंकार हेर्लेकर,निलेश अगरवाल चैतन्य इंगळे,डॉ.संजय वाडकर हेमराज थावानी प्रा.प्रवीण जावीर,रतिका शर्मा,आरती फल्ले,महेश वंजारी सौ.सविता धुमाळ,मेघना ठाकुर ,हनुमान खटिंग, वर्षा माने, धनंजय माने, इ संचालक उपस्थित होते.कार्यक्रमांची सांगता राष्ट्रागीत गायनाने उत्साहात झाली.
हा कार्यक्रम आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आला होता.