दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुलै २०२२ । फलटण । येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यातील सासवड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आयोजित करण्यात येणार्या मेडीकल कॅम्पसाठी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून औषधे मोफत प्रदान करण्यात आलेली आहेत.
अलगुडेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक अप्पासो शेंडगे यांनी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सासवड येथे डॉ. संदिप पोमण यांच्या मार्फत आयोजित करण्यात येणार्या मेडीकल कॅम्पला मोफत औषधे वितरित केली.