
दैनिक स्थैर्य । 5 मार्च 2025। फलटण । मॅग आणि माऊली फाऊंडेशन मुंबई संचलित जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त शनिवार दि. 22 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत स्वरा हाईट्स, रिंगरोड येथे दिव्यांगासाठी कृत्रिम पाय (जयपूर फुट) व कॅलीपरचे मोफत वाटप करण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर 9529233067, तात्यासाहेब गायकवाड 8600392424, प्रशांत धनवडे 9890043600 यांच्या संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.