
दैनिक स्थैर्य । 19 एप्रिल 2025। सातारा। डॉ.सॅम्युल हॅनेमन याची जयंती जगभरात आंतरराष्ट्रीय होमिओपॅथीक दिवस म्हणुन साजरी केली जाते. यादिवशी अनेक समाजोपयोगी वैद्यकीय उपक्रम राबवले जातात. यावर्षी प्रथमच तेजोनिधी होमिओपॅथीक-नॅचरोपॅथी क्लिनिक व माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबिराचे आयोजन गुरुवार दि. 17 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 2 या कालावधीत इ.सी.एच.एस पॉलिटेक्नीक सातारा येथे आयोजन करण्यात आले आहेे. या शिबिरामध्ये जुनाट व गुंतागुंतीचे आजार जसे की दमा, सर्व प्रकारची सांधेदुखी, मणक्यांचे विकार, सर्व प्रकारचे त्वचारोग, तसेच पचन संस्थेचे विकार इत्यादी सर्व प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. या शिबिराचे उद्घाटन कर्नल एम.ए. राजमन्नार एसएम, कमांडिग ऑफीसर महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी यांच्याहस्ते होणार आहे. या शिबिरात डॉ.जवाहरलाल शाहा, डॉ.स्नेहा शाहा, डॉ.अनुजा फडतरे निंबाळकर, डॉ.सोनल साबळे हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त माजी सैनिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.