दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२२ । सातारा । राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कर्तव्यपथ पंधरवडा साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सातारा व श्री. गौरीशंकर डायग्नोस्टीक सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा व तालुका स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या एकूण 87 आरोग्य तपासणी शिबीरांमधून 6555 जेष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली.
याप्रसंगी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण (दलित मित्र) श्रीमती शिला गिते, डॉ. अनिरूध्द जगताप, श्री विजय देशपांडे उपस्थित होते.
यावेळी सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी जेष्ठ नागरिकांचे जीवन सुसाह्य होणेसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. जेष्ठ नागरिकांनी अडचणीबाबत कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले.
श्रीमती शिला गिते यांनी विधवा प्रथा नष्ट करून विधवांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. अनिरूध्द जगताप, श्री गौरीशंकर डायग्नोस्टीक सातारा यांनी आरोग्य विषयक बाबीसंदर्भात मार्गदर्शन केले. श्री विजय देशपांडे, सचिव समर्थ परिसर जेष्ठ नागरिक संघ सातारा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात देशाच्या निवडणूक प्रक्रियेत जेष्ठ नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा यासाठी भारतीय निवडणूक आयोगामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधांचा लाभ घेवून मतदान करावे व तरूण मतदारांनी त्यांचे घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यासाठी प्रवृत्त करावे या आशयाचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांचे पत्राचे जेष्ठ नागरिकांना वितरण करण्यात आले.