क्रांतिसूर्य प्रतिष्ठानतर्फे वारकर्‍यांची मोफत आरोग्य तपासणी


दैनिक स्थैर्य । 2 जुलै 2025 । फलटण । आषाढी वारीला निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील हजारो वारकर्‍यांना येथील क्रांतिसूर्य प्रतिष्ठान व सातारा येथील युवासेवक प्रतिष्ठान, सुनील भगत मित्र परिवार, यश तुकाराम घाडगे यांच्या सहकार्याने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातत मोफत वैद्यकीय सेवा देऊन, औषधांचे वाटप करण्यात आले.

क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्यावतीने वर्षभर सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये माउलींच्या सोहळ्यातील हजारो वारकर्यांना वैद्यकीय सेवा दिली जाते. यावेळी मिलिंदआप्पा नेवसे, दादासाहेब चोरमले सहभागी झाले होते.

या शिबीरात यश घाडगे, विशाल दळवे, डॉ. संकेत होगले देशमुख, डॉ.संकेत सुरवसे, डॉ. रितेश सावंत, डॉ. राजेश निगडे, डॉ. सिद्धेश आटोळे, डॉ. शंकर जाधव, डॉ. चैतन्य जगताप, डॉ. धनराज ढोणे, डॉ. हितेश वळवी, डॉ. वैजू सांगळे, डॉ. प्रतीक सोनवलकर, डॉ. दत्तप्रसाद पोंदकुले, डॉ. सुमित पाटील, डॉ. शंतनु शेळके. अजय नवघणे सहकारी मित्र यांनी वारकर्‍यांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार दिले.


Back to top button
Don`t copy text!