
दैनिक स्थैर्य । 7 मार्च 2025। फलटण । राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत फलटण तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळांमधून व अंगणवाड्यांमधून शून्य ते अठरा वयोगटातील बालकांची मोफत आरोग्य तपासणी वैद्यकीय अधीक्षक व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. 31 मार्च अखेर करण्यात येणार आहे.
सध्या तालुक्यात आरबीएसके अंतर्गत चार पथके कार्यरत आहेत. या पथकामार्फत तालुक्यातील शून्य ते अठरा वयोगटातील बालकांची मोफत शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या तपासणी दरम्यान बालकांमध्ये आढळणार्या व्यंगाबद्दल मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
गंभीर स्वरूपाचे आजार असणार्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेची गरज असणार्या लाभार्थ्यांना हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. या आरोग्य तपासणी लाभ घेण्याचे आवाहन उपजिल्हा रुग्णालयांच्यावतीने करण्यात आले आहे.