दैनिक स्थैर्य | दि. १० जुलै २०२४ | फलटण |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी असणार्या वारकर्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. शांतिनाथ बागेवाडी, डॉ. अनुप दोषी, डॉ.गायत्री देशपांडे, डॉ. भावेश ठाणगे व डॉ. धन्वंतरी सस्ते हे उपस्थित होते. तसेच शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय सोलापूर, सावकार आयुर्वेद कॉलेज सातारा, सावकार होमिओपॅथी कॉलेज सातारा आणि महालक्ष्मी होमिओपॅथी कॉलेज सातारा येथील वैद्यकीय प्रशिक्षणार्थी व डॉक्टर हे उपस्थित होते.
सूत्रसंचालन श्रीनाथ साळुंखे यांनी केले. या कार्यक्रमात उंब्रज येथील विद्यार्थी परिषदेचे एक कार्यकर्ते शिवतेज शेटे यांनी मार्गदर्शन केले. आभार अॅड. विजय कुलकर्णी यांनी मानले.
या कार्यक्रमास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या इतर कार्यकर्त्यांसह संजय श्रीखंडे, रवींद्र फडतरे उपस्थित होते.