दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील उद्यानकन्या सायली म्हस्के, शिवांजली माने, पूनम राऊत, सई झगडे, सोनाली कदम, सुप्रिया ठोंबरे या प्रशिक्षणासाठी सांगवी, ता. फलटण, जि. सातारा येथे दाखल झाल्या असून दि. १४ ऑगस्ट २०२३ रोजी या उद्यानकन्यांतर्फे सांगवी येथे मोफत डोळे तपासणी शिबीर अणि मोतीबिंदू निदान तसेच अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी कुल्लोळी नेत्रालय व फेको सेंटर, सांगली येथे कार्यरत असलेले नेत्र चिकित्सक श्री. स्वप्निल ढेंबरे आणि श्री. शरद शिर्के उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या दरम्यान सुमारे ५० ते ६० गावकर्यांनी डोळे तपासणी करून घेतली. तसेच १० ते १५ गावकर्यांचे मोतीबिंदू निदान झाले. या शिबिरास गावकर्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमास गावचे सरपंच श्री. संतोष मोरे व उपसरपंच सौ. शर्मिला जगताप व सोसायटीचे चेअरमन श्री. महादेव कदम अणि इतर ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य लाभले. श्रीमंत शिवाजी राजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर अणि कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. डी. पाटील सर आणि प्रा. जे. व्ही. लेंभे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पाडला.