लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोव्हीड हेल्थ केअर सेंटरमधील रुग्णांसाठी संभाजी बिग्रेड कडून मोफत अंडी; भाजपाचे शहराध्यक्ष अमोल सस्ते यांची माहिती


स्थैर्य, फलटण, दि. १५ : कोरोनाबाधित रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्स आणि औषधांचा तुटवडा जाणवत असून एकूणच आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आलेला आहे. दुसरीकडे या संसर्गापासून आपला बचाव व्हावा, यासाठी लोक आपल्या आहार विहारामध्ये बदल करताना दिसत आहेत. कोरोना काळात दररोज अंडी खा, प्रोटीन्स खा असं आवर्जून सांगितलं जात आहे, म्हणूनच संभाजी बिग्रेडच्या वतीने लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोव्हीड हेल्थ केअर सेंटरमधील रुग्णांसाठी ५०० अंडी मोफत दिली असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे फलटण शहर अध्यक्ष अमोल सस्ते यांनी दिली.

संभाजी बिग्रेडचे सातारा जिल्ह्याध्यक्ष विशाल शिंदे यांच्या मार्गदशनाखाली संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते अभिजीत भोसले, विशाल भोसले, तेजस लोणकर, प्रदीप घाडगे, संग्राम साळुंखे, सचिन अभंग, राहुल शिर्के, सुबोध शिर्के, पंकज शिंदे, विनीत शिंदे, बजरंग भगत, वैभव अभंगयांची उपस्थिती या वेळी होती.


Back to top button
Don`t copy text!