तिरकवाडी गावात इन्र्फेड थर्मामीटर, आँक्सीमीटर, फेस मास्क व अर्सेनिक अल्बम 30 या औषधाचे मोफत वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, तिरकवाडी, दि. 23 : तिरकवाडी गावाचे भूमिपुत्र श्री. दगुभाई महंमद शेख (वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग उस्मानाबाद जिल्हा)  यांच्यावतीने तिरकवाडी ग्रामपंचायतीस कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत  ग्रामस्थांचे चेकींग करने करीता  इन्र्फेड थर्मामीटर, आँक्सीमीटर व गावातील सर्व ग्रामस्थांना फेस मास्क कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत प्रभावी ठरलेले व आयुष मंत्रालयाने शिफारस केलेले अर्सेनिक अल्बम 30 या औषधाचे मोफत वितरण करण्यात आले.

यावेळी तिरकवाडी गावासह अंतर्गत वाड्या-वस्त्यांवरील सर्व ग्रामस्थांना,प्राथमिक शाळेतील व अंगणवाडीतील मुलांना   १३०० फेस मास्कचे व औषधाचे मोफत वितरण करून हे औषध घेण्याबाबतची ची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.

अडचणीच्या काळात नेहमीच गावातील लोकांच्या मदतीला धावून येणारे श्री.दगुभाई महंमद शेख (वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग उस्मानाबाद जिल्हा) यांनी समाजाप्रती असलेले कर्तव्य म्हणून यापूर्वी पोलिस दलातील जवानांना  फेस मास्कचे व औषधाचे मोफत वितरण केले  असून गावातील सामाजिक कार्यात  नेहमीच त्यांचा सहभाग असतो. ते गावातील अनेक गरजू कुटुंबीयांना वेळोवेळी मदत करित असतात व यापुढेही गावासाठी आवश्यक मदत करण्याचे आवाहन त्यानी केले आहे.

त्यावेळी सुभाष चौरै साहेब ( पोलीस नाईक), तिरकवाडी गावच्या सरपंच जनाबाई खवळे , उपसरपंच रखमाबाई सोनवलकर,पोलीस पाटील अमोल नाळे, ग्रामपंचायत सदस्य शिरीष सोनवलकर, बापुराव पवार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक ननावरे (आण्णा), चॅांद मेटकरी, श्रीधर कदम, महावीर सोनवलकर, जुमाखान शेख, ॲडव्होकेट सर्फराज शेख, राजवली शेख, अरविंद सोनवलकर, गजानन शिंदे सर उपस्थित होते. त्यावेळी सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले व नानासाहेब काळुखे यांनी साहेबांचे आभार मानले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!