जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरमार्फत ३०० शेतकर्‍यांना होणार पाच वृक्षरोपांचे मोफत वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि.  १८ मे २०२३ | फलटण |
‘मॅग’ आणि ‘माऊली फाउंडेशन’ संचलित जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर, फलटण मार्फत येणार्‍या पावसाळ्यादरम्यान प्रथम नोंदणी करणार्‍या ३०० पर्यावरणप्रेमी शेतकर्‍यांना खालील अटींवर पाच वृक्षरोपांचे मोफत वाटप दि. २० जून २०२३ ते १५ जुलै २०२३ पर्यंत करण्यात येणार आहे.

वृक्षरोपे मिळविण्यासाठी शेतकर्‍यांना खालील अटींचे पालन करावे लागणार आहे.

दिलेल्या रोपांचे संगोपन व जतन करावे.
दिनांक ५ जून २०२३ पर्यंत नोंदणी अत्यावश्यक
रोपे दिलेल्या तारखेस आणि वेळेत जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरमधून स्वतः घेऊन जावीत.

लागवडीसाठी मोफत उपलब्ध केली जाणारी रोपे

वड किंवा पिंपळ
केसर आंबा
जांभूळ
पेरू किंवा चिक्कू
शेवगा

नोंदणी करण्यासाठी आणि रोपे घेऊन जाण्यासाठी जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर, दुसरा मजला, स्वरा हाईटस्, आर्यमन हॉटेलसमोर, डी.एड्. चौक, रिंगरोड, फलटण येथे संपर्क साधावा.
नाव नोंदणीसाठी संपर्क :

जनसेवा लॅब – ९५२९२३३०६७, डॉ. अतुल दोशी – ९७६७४६९९९८, श्री. तात्या गायकवाड – ८६००३९२४४४, श्री. प्रशांत धनावडे – ९८९००४३६००, श्री. राहुल कर्णे – ९८८१८१२५२०


Back to top button
Don`t copy text!