वाघोली येथे युवकांच्या मदतीने आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे मोफत वाटप


स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक,दि.२ (रणजित लेंभे) : वाघोली येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर आणि झोरिएट सॉफ्टवेअर पुणे यांच्या सौजन्याने आर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथी औषधाचे मोफत वाटप करण्यात आले. औषध कोरोना व्हायरस पासून संरक्षणासाठी उपयुक्त आहे, या गोळ्यांचे वाटप वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे, आरोग्य अधिकारी, डॉ. आदित्य गायकवाड, डॉ. शिवराज कणसे यांच्या हस्ते करण्यात आले.

येथील कै. बी. वाय. भोईटे विविध कार्यकारी विकास सोसायटी व दत्त मंदिर शेजारी आज गोळ्या वाटण्यात आल्या आहेत. या उपक्रमाचे आयोजक कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन शहाजी भोईटे, अमोल कुमार भोईटे, भाग्यश्री मेडिकल शिरवळचे प्रमुख दत्तात्रेय भुजंगराव भोईटे, शिवसेनेचे पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे विभाग प्रमुख प्रशांत तावरे या कामी परिश्रम घेतले व वाघोली गावातील सर्व ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!