आर्सेनिक अल्बम 30 औषधाचे भिलकटी गावात पोलीस पाटील शांताराम काळेल पाटील यांच्यावतीने मोफत वितरण


स्थैर्य, फलटण, दि. 27 : करोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेत प्रभावी ठरलेले व आयुष मंत्रालयाने शिफारस केलेले अर्सेनिक अल्बम 30 या औषधाचे भिलकटी येथील गाव कामगार पोलीस पाटील तथा गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष शांताराम काळेल पाटील यांच्यावतीने भिलकटी गावातील सर्व ग्रामस्थांना मोफत वितरण करण्यात आले.

गावासह गावांतर्गत वाड्या वस्त्या वरील सर्व कुटुंबाना या औषधांचे मोफत वितरण करुन हे औषध घेण्याबाबतची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. सर्व गावकर्‍यांनी पोलीस पाटील यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.

आपत्ती काळात नेहमीच पोलीस पाटील गावकर्‍यांच्या मदतीला धावून येतात, यापुर्वी  गावातील गरजू कुटुंबांना मोफत धान्य व गृहपयोगी वस्तू, किराणा यांचे वितरण पोलीस पाटील यांच्यावतीने करण्यात आले असून सतत पोलीस पाटील म्हणून उत्तम कार्य केल्यामुळेच सन 2019 चा जिल्ह्यातील सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार शांताराम काळेल पाटील यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!