स्थैर्य, फलटण : विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी यांच्यामार्फत ढवळ, ता.फलटण येथे गणेश चतुर्थीचे औचित्य साधून 2000 वृक्षांचं मोफत वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष पै. सुहास गोफणे उर्फ तातन वस्ताद, सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील लोखंडे, ढवळचे सरपंच आप्पासाहेब लोखंडे, महाराष्ट्र केसरी बापूराव लोखंडे, माजी सरपंच विष्णुपंत लोखंडे, शंकर लोखंडे, डॉ.नवनाथ लोखंडे, ढवळ विकास सोसायटीचे चेअरमन संजय घोरपडे, शंभू महादेव सोसायटीचे सेक्रेटरी श्रीरंग काळे, युवा नेते शरद लोखंडे, महाराष्ट्र चॅम्पियनशिप हिंदू गर्जना केसरी निलेश लोखंडे, महाराष्ट्र चॅम्पियन शिप आणि नवी मुंबई केसरी जयदीप गायकवाड, माजी सरपंच मनोहर गार्डे, माजी मुख्याध्यापक हरी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी चिंच, आवळा, जांभूळ, सिल्वरओक, पेरू, तत्सम फुल, कवट.इत्यादी प्रकारची झाडे मोफत वाटण्यात आली. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश गुलाब जानकर, मिथुन लोखंडे, ह.भ.प.शामराव लोखंडे, युवा नेते अंकुश लोखंडे, अमर लोखंडे, यांची मोलाची साथ लाभली. यावेळी ढवळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होता.