दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण तालुक्याच्या पूर्वभागातील आसू गावातील माता, भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक यांना मोफत आसू ते शिखर शिंगणापूर दर्शन मोफत सेवा पाच सोमवारसाठी सुरू केली आहे. जनमत फाउंडेशन महाराष्ट्रतर्फे सुभाषदादा पवार (येतकाळे) आणि युवा उद्योजक श्रीकांत उर्फ (आबा) शेडगे यांच्या सहकार्याने ही सेवा काळेश्वर आणि शंभू महादेवाच्या आशिर्वादाने सेवेचा प्रारंभ केला. गाड्यांना नारळ वाढवून पुढे प्रस्थान करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर डॉ. दशरथ भोई, राजेंद्र गोफने, अजित येतकाळे, संभाजी शेडगे, श्री. अशोक ढवळे, बाळासो चव्हाण, श्री. ज्ञानदेव गोफणे, राजेंद्र गायकवाड, अशोक बोंगाणे, श्री. रोहित शेडगे आणि आसू गावातील बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ही सेवा पाचही सोमवारी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी नोंदणी संपर्क ९९६०२४८०७७/९९२२२२११४४ वर करावा.