अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त मोफत दाढी कटिंग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ जुलै २०२२ । बारामती । राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (22 जुलै ) तांदूळवाडी येथील बोरावके वृद्धांश्रम मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत दाढी आणि कटींग ची सोय करण्यात आली होती.

सूर्यनगरी येथील बी. ए. सलून व टॅटूज चे संचालक आकाश पगारे व सहकारी कारागीर यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बोरावके वृद्धाश्रम चे सचिव किशोर मेहता, खजिनदार फकरूदिन कायमखानी, सहखजिनदार अमित बोरावके, विश्वस्त सुरेंद्र भोईटे व व्यवस्थापिका श्रेया कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. गेली 6 वर्षा पासून उपक्रम चालू असून कोरोना च्या काळात सुद्धा वाढदिवसानिमित्त खंड न पडता कार्यक्रम यशस्वी केला आहे सामाजिक बांधिलकी जोपासत ज्येष्ठाची सेवा होणे साठी मोफत दाढी कटिंग सेवा उपलब्ध करून दिली असल्याचे मनोगत मध्ये आकाश पगारे यांनी सांगितले.

या प्रसंगी 35 ज्येष्ठांची मोफत दाढी कटिंग करण्यात आली. आभार श्रेया कुलकर्णी यांनी मानले


Back to top button
Don`t copy text!