दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑक्टोबर २०२४ | बारामती |
मोशन अकॅडमी, बारामती आणि सकाळ विद्या एज्युकेशन यांच्यामार्फत दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी मोफत ‘दहावीनंतर करिअर निवड मार्गदर्शन सेमिनार’ रविवार, दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता मुक्ताई लॉन्स, सिटी इन चौक, सूर्यनगरी, बारामती येथे आयोजित केले आहे. या सेमिनारचा जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मोशन अकॅडमीचे डायरेक्टर प्रा. नीरज कुमार यांनी केले आहे.
या सेमिनारमध्ये डॉ. अ. ल. देशमुख (ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व माजी सदस्य, एस. एस. सी. बोर्ड) हे प्रमुख वक्ते असणार आहेत.
या सेमिनारमध्ये
- दहावीच्या परीक्षेला सामोरे कसे जायचे?
- ९० ते ९५% गुण मिळविण्यासाठी काय केले पाहिजे?
- परीक्षेचे टेन्शन न घेता, उपलब्ध वेळेत अभ्यास कसा करावा?
- पुढील उज्ज्वल भविष्यासाठी कुठले करिअर निवडायचे?
या मुद्यांवर चर्चा होणार आहे.