अपंग बालकांना मिरज येथील शासकिय संस्थेमध्ये मोफत प्रवेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२३ । सातारा । शासनाच्या अपंग कल्याण आयूक्तालय पुणे अंतर्गत अपंग (अस्थिव्यंग) बालकांसाठी मोफत शिक्षण , वसतिगृह, आणि गरजेनुसार अस्थिव्यंगोपचार शस्त्रक्रिया व कृत्रिम अवयव पुरवणारी शासकिय निवासी संस्था किल्ला भाग मिरज येथे आहे. सन 2023-23 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याचे शासकीय अपंग बालगृहाचे अधिक्षक यांनी कळविले आहे.

 ही मोफत शिक्षण सुविधा असून, संस्थेच्या परीसरात 1 ली ते 4 पर्यंतचे मोफत प्राथमिक शिक्षण. इयत्ता 5 वी पासून पुढील शिक्षण माध्यमिक शाळेमार्फत , माध्यमिक शाळेत जाण्यासाठी व येण्यासाठी  मोफत वाहतुकीची सुविधा, पाठयपुस्तके, वहया इतर शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेश मोफत ,मुलींसाठी विशेष काळजी घेण्यासाठी महिला काळजी वाहक असणार आहे.

वसतिगृहात अपंग मुलामुलींची स्वतंत्र निवास व्यवस्था व मोफत जेवण , प्रत्येक विदयार्थ्यास कॉट, गादी , बिछाणा व इतर साहित्याचा मोफत पुरवठा. दररोज अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय , पिण्यासाठी थंडगार व शुध्द पाण्याची सुविधा उपलब्ध असणार आहेत. 

अस्थिव्यंपोचार तज्ञांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया व भौतिकोपचाराची सुविधा, गरजेनुसार कृत्रिम अवयव , कुबडया, तीन चाकी सायकल वाटप. वयोगट 0 ते 6 करिता मोफत EARLY INTERVENTION CENTRE अंतर्गत भौतिकोपचार.

प्रवेशासाठी  प्रवेशित अस्थिव्यंग असला पाहिजे, वयोगट 6 ते 17 वर्षे , प्रवेश अर्जा सोबत सिव्हिल सर्जन यांनी  दिलेला अपंत्वाचा दाखला. शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला ,3  फोटो . प्रवेश अर्ज व माहिती पत्रक अधिक्षक, शासकीय अपंग बालगृह व शाळा , किल्ला भाग, बी.एस. एन.एल ऑफिस शेजारी, मिरज 416410 या पत्यावर समक्ष अथवा पोस्टाव्दारे मोफत मिळतील असे पाठवावे. 

अधिक माहितीसाठी 9325555981 ,9552234856 , 9422216459 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.


Back to top button
Don`t copy text!