शेअरबाजारात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने साडेसात लाखांची फसवणूक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ जून २०२२ । फलटण । लोकांचा विश्वास संपादन करुन शेअर्स मार्केट मध्ये गुंतवणुकीतून दुपटीने नफा मिळवून देतो असे सांगत लोकांकडून पैसे घेणाऱ्या साखरवाडीच्या भामट्यास फलटण ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

शेअर्स मार्केटच्या नावाखाली लोकांना दामदुप्पट नफा मिळवून देतो असे सांगत फसवणूक करणाऱ्या आरोपी पांडुरंग दत्तात्रय चव्हाण, वय ४१, राहणार साखरवाडी ता फलटण याच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीसात विक्रम जगन्नाथ भोसले, ,राहणार साखरवाडी यांनी २३ जुन रोजी तक्रार दाखल केली होती. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी लगेच तपास सुरू केला असता आरोपीच्या खात्यामध्ये फिर्यादीने सात लाख सहासष्ट हजार पाचशे रुपये रक्कम पाठवल्याचे लक्षात आले. तसेच आरोपीने गावातील आणखी दोघांना आणि दोन ऊसतोडणी कामगारांनाही गंडा घातल्याचे निदर्शनास आले. त्यावरून आरोपीला २३ जुन रोजी रात्री साडेआठच्या सुमारास अटक करण्यात आली असून माननीय न्यायालयाने सदर आरोपीला 3 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे. आरोपीआरोपीकडून अद्याप कोणत्याही प्रकारचा मुद्देमाल मिळाला नाही. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक गोडसे, म. पोलीस उपनिरीक्षक धोंगडे करत आहेत.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता आणि दररोज घडणाऱ्या फसवणुकीच्या घटना लक्षात घेता लोकांनी शेअर बाजाराचे संपूर्ण ज्ञान संपादन करुन, तसेच आपली संपत्ती आणि गोपनीयता जपणाऱ्या विश्वासू माध्यमांतून गुंतवणूक करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक गोडसे आणि म.पो.उपनिरीक्षक धोंगडे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!