दैनिक स्थैर्य | दि. 18 डिसेंबर 2024 | सातारा | सात जणांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून ८० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याबद्दल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रमोद रमेशपाटील (आगाशिवनगर, मलकापूर) या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, की काले गांधीनगर येथील अल्लाउद्दीन गुलाब तांबोळी आणि त्यांचे मित्र श्यामसुंदर सारडा या दोघांची प्रमोदपाटील याच्याशी ओळख झाली. त्यांना गुंतवणूक करण्यास पाटील यांनी सांगितले.
त्या गुंतवणुकीची विश्वासार्हता म्हणून त्याच रकमेचे धनादेश आणि नोटरी करून देण्याचेही पाटील याने कबूल केले. त्यानुसार अल्लाउद्दीन तांबोळी यांनी मार्च २०२२ मध्ये साडेदहा लाख लाख रुपये, श्यामसुंदर सारडा यांनी २१ लाख रुपये प्रमोद पाटील यांना दिले.
मात्र, २०२२ पासून २०२४ पर्यंत प्रमोद पाटील याने दोघांनाही मूळ रक्कम अथवा त्याचा परतावा दिला नाही.
त्यामुळे अल्लाउद्दीन तांबोळी आणि श्यामसुंदर सारडा यांनीवारंवार पैशाची मागणी करूनही पाटील याने त्यांना टाळले. यावरून अल्लाउद्दीन तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रमोद पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस उपनिरीक्षक मारुती चव्हाण तपास करत आहेत.