नोकरीच्या आमिषाने सव्वा कोटींची फसवणूक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. १६ : राज्य शासनाच्या परिवहन विभागात नोकरीला लावतो असे सांगून फलटण तालुक्यातील युवतीला सव्वा कोटींचा चुना लावणार्‍या भामट्याला फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद हरीचंद्र रनवरे (मलठण, ता. फलटण) असे अटकेतील संशयिताचे नाव असून योगीता शिवाजी गुंजवटे (रा. झिरपवाडी ता.फलटण) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमोद रनवरे याने 2009 सालापासून योगिता यांना आरटीओ मध्ये नोकरीला लावतो असे सांगून तिच्या वडीलांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उखळले. तसेच नियुक्तीची खोटी पत्रे पाठवून योगिता व तिच्या वडिलांची फसवणूक करून एक कोटी 25 लाखांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर योगीताने फलटण शहर पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊळ करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!