फसवणूकप्रकरणी एकावर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. २१ मे २०२२ । सातारा । कर्ज थकवून छोटा हत्ती टेम्पो विकला. याप्रकरणी नीरा, ता. पुरंदर येथील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उन्मेश उल्हास शिर्के, रा. नीरा, ता. पुरंदर याने विसावा नाका येथील एका कार्यालयात राजेश संदिपान गवळी रा. क्षितिज अपार्टमेंट, चिमणपुरा पेठ, सातारा यांच्याकडून छोटा हत्ती टेम्पोचे कर्जाचे हप्ते भरण्याच्या अटीवर करार करून तो चालविण्यास घेतला होता. मात्र, दि. ८ मे २०२० ते दि. १८ मे २०२२ या कालावधीत करारानुसार कर्जाचे हप्ते न भरता ३ लाख २६ हजार ९४४ रुपयांचे कर्ज थकून छोटा हत्ती टेम्पो परस्पर विकून फसवणूक केल्याची तक्रार राजेश गवळी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.


Back to top button
Don`t copy text!