दिगंबर आगवणे यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१२ एप्रिल २०२२ । फलटण । दिगंबर रोहिदास आगवणे यांनी स्वराज नागरी सहकारी पतसंस्था फलटण या संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी फलटण न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार फलटण शहर पोलीस ठाण्यात दिगंबर आगवणे यांच्या विरोधात फसवणूकिचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिगंबर रोहिदास आगवणे (रा. गिरवी ता. फलटण) हे स्वराज नागरी सहकारी पतसंस्था फलटण या संस्थेचे सभासद असून त्यांनी एक कोटी रुपयाचे कर्ज मागणी करून त्याकरिता तारण म्हणून मौजे सुरवडी तालुका फलटण गावच्या हद्दीतील गट नंबर 48 /2 मधील एकूण क्षेत्र 4 हेक्टर 22 आर मधील हिस्सा 2 हेक्टर 46 आर यावर स्थावर मिळकतीचा कायदेशीर मालकी नसताना ती आपली आहे असे भासवून फिर्यादीचे संस्थेचे फसवणूक करण्याच्या उद्देशाने तारण/ गहाण म्हणून तसेच ती मिळकत किमती असल्याचे भासवून तसा बनावट सर्च रिपोर्ट घेऊन, कर्ज रक्कमेसाठी गहाण खत करून फिर्यादीचे संस्थेची आर्थिक फसवणूक केली तसेच कर्ज वसुलीतून बगल देण्यासाठी माजी चेअरमन व संचालक मंडळ यांची वृत्तपत्र व इतर प्रसारमाध्यमात द्वारे खोटी व बदनाम कारक वक्तव्य केली आहे. म्हणून माननीय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी फलटण यांचे न्यायालयात फौजदारी खटला क्रमांक 177/ 22 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. त्यावरून न्यायालयाकडील जावक क्रमांक 3223/2022 दि. 11 एप्रिल 2022 रोजी सदर प्रकरणाचा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156 (3) प्रमाणे तपास करून अहवाल सादर करणेबाबत आदेश दिल्याने दिगंबर रोहिदास आगवणे यांचे विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. या गुन्ह्याची फिर्याद दत्तराज शिवाजीराव फडतरेशाखाधिकारी- स्वराज नागरी सहकारी पतसंस्था फलटण (रा. फडतरवाडी ता. फलटण) यांनी दिली असून या गुन्ह्याचा अधिक तपास पीएसआय कदम हे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!