दैनिक स्थैर्य । दि. २८ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन आमच्या पक्षाच्या वतीने १४ जागा लढवणार असल्याचे सूतोवाच रिपब्लिकन पक्षाचे (ए) राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले. सातारा जिल्ह्यातील अन्य नगरपालिकांमध्येही जास्तीत जास्त जागा लढवून पक्षाची ताकद दाखवून देऊ असेही त्यांनी सांगितले.
निकाळजे पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्वव्यापी आहेत. त्यांचे विचार आम्ही पुढे नेण्याचे काम करणार आहोत. बौध्द समाजासोबत मराठा, वडार, कैकाडी, धनगर, मुस्लीम अशा विविध समाजघटकातील लोक आमच्यासोबत आहेत. या सर्वांना बरोबर घेऊन आमची वाटचाल सुरू असून सर्वांना प्रतिनिधित्व देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यादृष्टीने सातारा नगरपालिका निवडणुकीत १४ जागा स्वबळावर लढवण्याचे नियोजन आम्ही केले आहे, असे त्यांनी सांगितले.
दरवर्षी मागासवर्गींच्या कल्याणासाठी ७०० ते ८०० कोटींचा निधी येतो. गोरगरीबांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामासाठी तो खर्ची पडला पाहिजे. परंतु नेत्यांच्या निष्काळजीपणामुळे निधी खर्च न होता परत जातो. त्याबाबतीत आवाज उठवणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शालेय शिक्षण साताNयातील ज्या शाळेत झाले, त्या प्रतापसिंह हायस्वूâलला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. पुढील काळात आपल्याला ते दिसून येईल असेही ते म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर जास्तीत जास्त जागा लढवण्याची आमची भूमिका आहे. गतवेळी आमच्या पक्षाने ३ जागा मिळवल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत आमच्या पक्षाने सोबत यावे म्हणून काहींनी संपर्वâ केला आहे. मात्र त्याविषयी अजूनपर्यंत कोणासोबत जायचे याबाबत निर्णय घेतला नसल्याचेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेवेळी प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, राज्य संघटक जोगदंड आदी उपस्थित होते.